25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणपहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

Google News Follow

Related

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षापासून दिला जाणारा ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना २४ एप्रिल रोजी मुंबईत  या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादिदींना बहिण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराकरता २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास अनुकुलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली आहे.

उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘लता दीनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. देशहित, समाजहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबियाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींन नंतर पुढच्या वर्षी हा पुरस्कार क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. तसेच २४ एप्रिलला लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा फलकदेखील लागणार आहे.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’

‘कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा उंचावेल’

पुरस्काराविषयी बोलताना ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, “प्रत्येत क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.  १५  वर्षांपूर्वी आम्ही दीनानाथ मंगेशकर नवे हॉस्पिटल बांधले होते तेव्हा नरेंद्र मोदींनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दरम्यान भाषणात लता दिदींनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा