22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण'श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा'

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

Google News Follow

Related

आज, १० एप्रिल रामनवमी निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात विधीवत पूजा करून प्रभु श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आमदार राहुल ढिकले, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ” प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत, असे भगत सिंह कोश्यारी म्हणाले आहेत.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, प्रभू श्रीराम हे केवळ दैवत नसून ते एक मर्यादा पुरूषोत्तमही आहेत. लंका जिंकूनही त्यांनी ती परत केली, त्यामुळे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत संपूर्ण भारताचे आदर्श आहेत. महात्मा गांधीनीही त्यांना त्यांचे आदर्श मानून आपल्या ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम’ या भजनातून प्रभु श्रीरामांचे महत्व अधोरेखित केले आहे. श्रीराम चरित्राचा जेवढा आपण अभ्यास करू तेवढा आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल’ असेही राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

हिमाचलमध्ये आप ला धक्का, प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते भाजपात

मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर लावली हनुमान चालीसा

अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले

नितीन गडकरी यांच्यानंतर, रावसाहेब दानवे गेले राज ठाकरेंच्या भेटीला

तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी रामनवमीच्या शुभप्रसंगी त्यांना ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य मिळाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमीतील लोक अधिक भाग्यवान असून ते या पावन भूमीत त्यांचे वारंवार दर्शन घेत असतात, ते त्यांनी निरंतर घेत रहावे असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला आहे. प्रभु श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात आपण सर्वांनी अंगीकार करायला हवा, असे सांगून कोश्यारींनी संपूर्ण राज्याला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा