23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरअर्थजगतटीजेएसबी सहकारी बँकेची भरारी! केला वीस हजार कोटींचा व्यवसाय

टीजेएसबी सहकारी बँकेची भरारी! केला वीस हजार कोटींचा व्यवसाय

Google News Follow

Related

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२  या आर्थिक वर्षात टीजेएसबी सहकारी बँकेने वीस हजार कोटी रुपयांची एकूण व्यवसायाची उत्तुंग भरारी घेतली आहे. दरवर्षी प्रमाणे लेखापरिक्षित आर्थिक निकाल दहा एप्रिल पूर्वी घोषित केरण्याची आपलीं परंपरा बँकेने या वर्षी देखील राखत दिनांक ९ एप्रिल २०२२ रोजी लेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

सन २०२१-२२  हे बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. या सुवर्ण महोत्सवी वर्षात बँकेच्या ठेवीत रुपये १२८७/-  कोटींची भरीव वाढ होत त्या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी रुपये १३,३३६/-  कोटी झाल्या आहेत.  याच वर्षात बँकेचा कर्जपुरवठ्यात देखील रुपये १०९२/- कोटी रूपयांची वाढ होऊन रुपये ६७२३/- कोटी इतका झाला आहे. 

टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद पत्की यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. विवेकानंद पत्की म्हणाले, “टीजेएसबी बँक आपले लेखापरिक्षित निकाल, म्हणजे Audited Results, दरवर्षी, ९ किंवा १० एप्रिलला म्हणजे आमचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपल्यानंतर केवळ ९ ते १० दिवसांत जाहीर करत असते. इतक्या कमी कालावधीत, आपले लेखापरिक्षित निकाल जाहिर करणारी टीजेएसबी ही भारतातील नागरी सहकारी बँकिंग मधील कदाचित पहिल्या क्रमांकाची बॅंक असावी. Strong Corporate Governance, सर्व व्यवहारातील आमची संपूर्ण पारदर्शकता, सचोटी, सच्चाई, तत्परता आणि व्यावसायिक कौशल्य यांमुळेच आम्ही हे गेली १२ वर्षे सातत्याने करू शकलो आहोत. आणि म्हणूनच टीजेएसबी बॅंक ही आज “भरोसे का बँक”, “भविष्य का बॅंक” म्हणून ओळखली जात आहे.” असे सांगून, अध्यक्ष श्री. विवेकानंद पत्की म्हणाले, “गेलं वर्ष आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं. या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी, आम्ही आमच्या व्यवसायासाठी १९,७२० कोटी रुपयांचं उद्दिष्ट निश्चित केले होते. १९७२ साली स्थापना म्हणून १९,७२०ठरवले होते. आणि, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की,  आम्ही हे उद्दिष्ट ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्जिन राखून पूर्ण केले. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ नोंदवत, आम्ही २०,०५८ कोटी रुपयांच्या व्यवसायाची पातळी ३१ मार्च २०२२ रोजी गाठली. हे करत असताना, आमच्या ठेवींमध्ये ११ टक्क्यांची तर कर्ज पुरवठ्यामध्ये १९ टक्क्यांची वाढ झाली. २०,००० कोटी हा बॅंकेच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा milestone आहे, असे मी मानतो.”

हे ही वाचा:

१८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार बुस्टर डोस

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया

सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी

“आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये बॅंकेने २३७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर १५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. या वर्षीचा ढोबळ नफा हा बॅंकेच्या ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च ढोबळ नफा आहे, हे मी अत्यंत अभिमानाने आपणास सांगू इच्छितो.“

“बॅंकेचा स्वनिधी आज १४१२ कोटी रुपये आहे. बॅंकेचा Capital Adequacy Ratio हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे जो बॅंकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचे द्योतक आहे.”

“बॅंकेच्या ढोबळ अनुत्पादित कर्जांचं प्रमाण, जे गेल्या वर्षी ४.२३% होतं, ते या वर्षी ३.९३% इतके कमी झाले. बॅंकेने निव्वळ NPA चे प्रमाण हे गेल्या वर्षीप्रमाणेच ०% राखले आहे. बॅंकेचा Provision Coverage Ratio हा १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच, बॅंकेने NPA कर्जांपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद केलेली आहे.”

“आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता यापेक्षा चांगल्या प्रकारे होऊच शकली नसती.”

“ग्राहकांच्या डिजिटल बॅंकिंग व तत्सम सेवांबद्दलच्या आग्रही तसेच वाढत्या मागण्या, बॅंकेचा वाढता व्यवसाय, सर्वच बॅंकांसमोर असलेली सायबर सिक्युरीटी संदर्भातील दररोज वाढणारी आव्हाने या गोष्टींचा विचार करून बँकेने सध्याचे कोअर बँकिंग सोल्युशन बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बॅंकेने यासाठी टीसीएस या नामांकित कंपनीच्या कोअर बँकिंग सोल्युशनची निवड केलेली आहे. हा बदल या वर्षात कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.”

“बॅंकेच्या या सर्वांगीण प्रगतीमध्ये बॅंकेचे भागधारक, बॅंकेचे ग्राहक, बॅंकेचे सर्व हितचिंतक, संचालक मंडळातील माझे सहकारी, Board of Management चे सदस्य, आणि संपूर्ण टीजेेएसबी टीम या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.” असेही टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विवेकानंद पत्की यांनी सांगितले.  

टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील साठे यावेळी बोलताना म्हणाले, Return on Assets, Net Interest Margin, CRAR या महत्वाच्या बाबींमधील बँकैची कामगिरी देखील RBI किंवा IBA यांच्या मापदंडापेक्षा अधिक चांगली आहे. बँकांची CBS प्रणाली बदलणयाची प्रक्रिया सध्या कार्यरत असून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ती पूर्ण होईल.  या आधारे बँक आपल्या ग्राहकाना अधिकाधिक तत्पर आणि उत्तम सेवा देईल असा विश्वास बँकेला आहे. बँकेची वरील सर्व आकडेवारी बँकेची सर्वांगीण आर्थिक प्रगती दर्शवत असून बँक भविष्यात देखील आपल्या व्यवहारतील वृद्धि करताना गुणवत्तेवरील आपला भर कायम राखील, असे टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील साठे यांनी सांगितले.

पत्रकार परिषेदला टीजेएसबी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री. शरद गांगल यांच्यासह संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा