27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामातलहा सईदला भारताने घोषित केले दहशतवादी

तलहा सईदला भारताने घोषित केले दहशतवादी

Google News Follow

Related

कुख्यात दहशतवादी आणि मुंबई येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलहा सईद याच्याविरोधात भारत आक्रमक झाला आहे. तलहा याच्या विरोधात मोठी कारवाई करताना भारताने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. १९६७ सालच्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

दहशतवादी कारवायांसाठी युवकांची भरती करणे, टेरर फंडींगच्या माध्यमातून आर्थिक रसद जमा करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. तर त्यासोबतच अफगाणिस्तानमधील भारत सरकारच्या मालमत्तांना नुकसान पोहोचवण्याच्या कारवाया करण्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच शनिवार, ९ एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालय मार्फत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हाफीज सईद हा सध्या तुरुंगात सडत आहे. त्यामुळे त्याच्या संघटनेची सर्व सूत्रे तलहा सईद याच्या हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर याच्या विरोधात करण्यात आलेल्या या कारवाईचा महत्त्व वाढले आहे.

हे ही वाचा:

‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया

गोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री

तलहा सईद भारत विरोध वक्तव्यांमुले कायम चर्चेत असतो. लोकांची माथी भडकवून त्यांना हिंसेचा मार्ग स्वीकारण्यासाठी उद्युक्त करणे. काश्मीर प्रश्‍नावरूनही सतत भारत विरोधी वक्तव्य त्याने केली आहेत. त्याच्या एका व्हिडिओमध्ये काश्मीरचा बदला घेतला जाईल असे म्हणत तो जिहादची भाषा बोलताना दिसला होता.

तलहा सईद याला दहशतवादी घोषित केल्यानंतर या विषयात आणखीन काही कारवाई केली जाते का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या याला भारतात घेऊन येण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पण अद्याप त्यांना अद्याप यश आलेले नाही. तर आत्ता तलहा यालादेखील दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर त्यालाही आता भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा