24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामापुण्यात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

Google News Follow

Related

पुण्यात एक किळसवाणी घटना समोर आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढताना दिसत आहेत. पुणे स्टेशन ते माल धक्का दरम्यान येणाऱ्या एका सार्वजनिक शौचालयात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे असं घृणास्पद कृत्य घडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे स्टेशन ते माल धक्का चौक या येणार्‍या सार्वजनिक शौचालयमध्ये १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भरदुपारी ही घटना शौचालयात घडली आहे. पीडित मुलगी ही शौचालयात गेली असता नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ मुलगी आली नाही म्हणून तिचे काका शौचालायत बघायला गेले आणि त्यांनी दरवाजा वाजवला. त्याच क्षणी आरोपीने दरवाजा उघडून मुलीच्या काकाला बाजूला करून पळून गेला.

पीडित मुलीने झालेला प्रकार काकाला आणि घरच्यांना सांगितली. नराधमाचे कृत्य कळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ अधिक माहितीचा तपास घेण्यास सुरवात केली आहे. पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी त्याच भागातील असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया

गोव्याच्या मंत्रिमंडळात आता झाले १२ मंत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते माल धक्का चौक दरम्यान एक सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या जवळपासच पीडित १२ वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहतात. शुक्रवारी,८ एप्रिल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्या मागे एक व्यक्ती गेला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शौचालयात घुसला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा