25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत  

ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत  

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते आज दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, याद्वारे दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या संजय राऊत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी INS विक्रांत नावाने भ्रष्टाचार केल्याचे आरोप पुन्हा केले आहेत.

संजय राऊत यावेळी म्हणाले की, हे शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन नाही. ही लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे. आज INS विक्रांतप्रकरणी जो घोटाळा झाला आहे त्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज महाराष्ट्रातील गावपातळीवर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. पुढच्या २५ वर्षात भाजपाची सत्ता येणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मी दिलेल्या पुराव्यांवर अजून कारवाई का केली गेली नाही. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षा होती की ते सोमय्या यांना जाब विचारातील, असे राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI

विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही

लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित

केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे हे आमच्यावर हल्ले करतात. हे आमच्यावर कारवाई करुन काय करणार? आम्हाला तुरुंगात टाकतील, आम्हाला ठार मारतील. यासाठीही आम्ही तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदून ठेवली आहे हीच कबर तुम्ही देशातही खोदून ठेवत आहात. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असाल तर आम्ही त्याविरोधात बोलत राहू, असंही राऊत यांवेळी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा