31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणराजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!

Google News Follow

Related

अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाकरे सरकारवर चांगलीच आक्रमक झाली होती. राजू शेट्टी अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज होते. अखेर आज राजू शेट्टींनी महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे कोल्हापुरात जाहीर केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेले नाही. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होते. शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू होते. मात्र, ठाकरे सरकारने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने मविआवर राजू शेट्टी नाराज होते.

राजू शेट्टी यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. ठाकरे सरकारने सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करताना सूचक म्हणून राजू शेट्टींचे नाव घेतले होते. मात्र जेमतेम अडीच वर्ष राजू शेट्टींनी मविआमध्ये तग धरला.

हे ही वाचा:

सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक

अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत

… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’

संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

दरम्यान, ठाकरे सरकारला आता राज्यात अडीच वर्ष पूर्ण होत असताना भारतीय जनता पार्टीकडून २०२४ ची हाक देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजूनच वाढत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा