मुबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांची सोमवारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी तीन तास चौकशी करून सोडून दिले. पोलिसांनी तीन तास प्रश्नांचा भडिमार केला, पोलिसांवर सरकारचा दबाव होता, असे प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुबै बँक बोगस मजूर प्रकरणी मागील महिन्यात माता रमाबाई आंबडेकर मार्ग पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणूक, बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरेकर यांनी खोटी माहिती आणि बोगस दस्तावेज देऊन मुबै बँकची संचालक पदाची निवडणूक लढवूनजिंकून आले होते असा आरोप सामजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी करून तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र गेल्याच आठवड्यात न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून अद्याप त्याचा निकाल लागलेला नाही, दरेकर यांना न्यायालयाने दोन आठवड्याचा दिलासा देत दरेकर यांना अटक करू नये, अशा मुंबई पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा:
तुरुंगात पडून अनिल देशमुखांच्या खांद्याला इजा
दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली
केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला
पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना ४१ डी ची नोटीस पाठवून सोमवारी चौकशीसाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. सोमवारी दुपारी दरेकर हे चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तीन तासाच्या चौकशीनंतर दरेकर यांचा जबाब नोंदवून त्यांना सोडण्यात आले. पोलिस सरकारच्या दबाबावर काम करीत असून माझी या ठिकाणी तीन तास चौकशी करण्यात आली, मला उलटसुलट प्रश्न उचरण्यात आले असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांना दिली.