राज्यभरात यंदा निर्बंधमुक्त गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी राज्यभरात नागरिकांनी एकत्र येऊन कोणत्याही नियमांविना, मास्कविना हा हिंदू नव वर्षाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. याच सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मराठीत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही ट्विट करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकजीवनाला आनंद देणारे हे सण आपल्याला सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेच्या धाग्यात बांधतात. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा, अशा शुभेच्छा राष्ट्रपती यांनी दिल्या आहेत.
चैत्र शुक्लादि, उगादी, गुड़ी पड़वा, चेती चाँद, नवरेह व साजिबु चेरोबा पर सभी देशवासियों को शुभकामनाएं। लोक जीवन में उल्लास भरने वाले ये उत्सव हमें सांस्कृतिक और सामाजिक एकता के सूत्र में पिरोते हैं। मेरी कामना है कि ये त्योहार सभी के जीवन में सुख-समृद्धि लाएं।
— President of India (@rashtrapatibhvn) April 2, 2022
हे ही वाचा:
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….
श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू
आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी
शनिवार, २ एप्रिल सकाळपासूनच राज्यातील मुंबई, ठाणे, डोंबिवली, दादर, गिरगाव, नागपूर आदी भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत होता. तरुणाईने एकत्र येऊन मोठ्या उत्सहात हा सण साजरा केला. ढोल ताशा पथक, लेझीम पथकाने स्वागत यात्रेत सहभाग घेतला होता. यात्रेमध्ये तरुण-तरुणी, नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तसेच महिलांची बाईक रॅली देखील काढण्यात आली होती.