भारताचा शेजारील देश श्रीलंकेत सध्या भीषण महागाई सुरू आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे श्रीलंकेची राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवार, १ एप्रिल रोजी रात्री आणीबाणी जाहीर केली.
राष्ट्रपती भवनाबाहेर शुक्रवारी हजारो नागरिकांनी निदर्शने केली. तसेच संतप्त नागरिक आता राष्ट्रपतींव्हा राजीनाम्याची मागणी करत आहेत. सध्याच्या सरकारची धोरणे आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे.
दरम्यान या हिंसाचारादरम्यान संतप्त नागरिकांनी रस्त्यावरील वाहने आणि पोलिसांच्या गाड्या जाळल्या. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून फायर गॅस सोडण्यात आला. श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात १० जण जखमी झाले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी
‘ऑनलाईन ज्ञान घेऊन ते जीवनात वापरायला हवं’
देशामध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर, गॅसचा आणि इंधन तुटवडा अशा समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. वीज वाचवण्यासाठी सरकारने पथदिवे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी औषधांच्या कमतरतेचं कारण देत शस्त्रक्रीया थांबवल्या होत्या.