31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियाश्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू

श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू

Google News Follow

Related

भारताचा शेजारील देश सध्या मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. या परिस्थितीमुळे आता श्रीलंकेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक संकटामध्ये सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने सरकारविरोधात निषेध नोंदवण्यासाठी लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवार, ३१ मार्च रोजी रात्री उशीरा स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत राष्ट्रपतींनी राजानीमा द्यावा अशी मागणी करण्यात आली. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. या नागरिकांना रोखण्यासाठी सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे. तर या प्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोलंबोमध्ये आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आणि त्यातूनच हिंसा सुरु झाली. आंदोलनकर्त्यांनी त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. लोकांनी एका बसला आग लावल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रपतींच्या घरासमोर हा सारा गोंधळ सुरु असताना ते स्वत: मात्र घरी नव्हते.

हे ही वाचा:

किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर

माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!

‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

देशामध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर, गॅसचा आणि इंधन तुटवडा अशा समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. वीज वाचवण्यासाठी सरकारने पथदिवे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी औषधांच्या कमतरतेचं कारण देत शस्त्रक्रीया थांबवल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा