25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरविशेषडेरवण क्रीडासंकुलाप्रमाणे दूरदृष्टीने क्रीडाविकास व्हावा!

डेरवण क्रीडासंकुलाप्रमाणे दूरदृष्टीने क्रीडाविकास व्हावा!

Google News Follow

Related

‘करोनाच्या कठीण काळानंतर कोकणात उत्साहाने पार पडलेल्या डेरवण यूथ गेम्स २०२२मध्ये (डीवायजी २०२२) यंदा सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करावेसे वाटते. कोणत्याही खेळात पदकविजेते खेळाडू घडवायला दूरदृष्टी असावी लागते. एसव्हिजेसीटीचे प्रमुख विश्‍वस्त विकास वालावलकर यांनी ही दूरदृष्टी दाखवून कोकणात हे क्रीडासंकुल उभारले आहे. अशीच दूरदृष्टी आपल्याकडच्या राजकारणी मंडळींनीही दाखवली, तर देशात अनेक दर्जेदार खेळाडू तयार होऊ शकतील’,असे प्रतिपादन भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांनी नुकतेच केले.

डीवायजी २०२२च्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या वेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
एसव्हीजेसीटीतर्फे (श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट) आयोजित ‘डीवायजी २०२२’या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवचा समारोप समारंभ अखिल भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. या वेळी गंधे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर, एसव्हीजेसीटी क्रीडा अकादमीचे संचालक श्रीकांत पराडकर, राष्ट्रीय टेबलटेनिसपटू अजित गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून सुमारे आठ हजारांहून अधिक खेळाडूंनी येथे झालेल्या १८ क्रीडा प्रकारांत भाग घेतला होता. खोखो, कबड्डी, बॅडमिंटन, शूर्टिंग, धनुर्विद्या, बुद्धिबळ, जिम्नॅस्टीक, येाग, मल्लखांब, कॅरम, टेबल टेनिस, फूटबॉल, बास्केटबॉल, वॉल क्लायम्बिंग, जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा या महोत्सवात आठ दिवस पार पडल्या.

हे ही वाचा:

हिजाब वादाचे पडसाद विरारमध्ये?

वक्फ बोर्ड आणि सच्चर रिपोर्टची सच्चाई!

भारतात सुरु होणार २१ नव्या सैनिकी शाळा

….म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा झोमॅटो कंपनीवर भडकले

 

स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या खेळाडूंना सुमारे सतरा लाखांची रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
एसव्हीजेसीटी क्रीडा अकादमीचे संचालक श्रीकांत पराडकर यांनी, गेले आठ दिवस सुरू असलेल्या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचा आढावा घेतला. यावेळी एसव्हिजेसीटी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

आपल्या भाषणात गंधे पुढे म्हणाले की, ‘शिक्षण आणि खेळ यांच्या परस्परसंबधांवर इंग्लंडमध्ये एक संशोधन करण्यात आले. दोन्हींची योग्यरीत्या सांगड घातल्यास खेळाडूंची कार्यक्षमता अनेक पटीने वाढते. खेळाडूंची स्मरणशक्ती, संवादक्षमता उत्तम असते. पराभव कसा स्वीकारायचा, कटू आठवणी कशा विसरायच्या आणि सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे एका खेळाडूला चांगल्या प्रकारे अवगत असते. एखाद्या वेळी यश मिळाले नाही तर खेळाडूचे मनोधैर्य कसे जपायचे ही त्यांच्या पालकांची मोठी जबाबदारी आहे.’

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा