‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या देशात चर्चेत आहे. या चित्रपटावरून मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापलं असून अनेक नेते याबद्दल टिप्पणी देत आहेत. याच क्रमवारीत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची भर पडली आहे.
गुलाम नबी आझाद हे दोन दिवसीय जम्मू दौऱ्यावर आहेत.त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘काश्मिरी पंडितांवरील झालेल्या अत्याचाराला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे. त्याचबरोबर आझाद यांनी खोऱ्यातील राजकीय पक्षांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी जनतेत फूट पाडली. विविध कारणांवरून लोकांमध्ये फूट निर्माण झाली आहे.
पुढे ते म्हणाले, राजकीय पक्ष धर्म, जात आणि इतर गोष्टींच्या आधारावर लोकांमध्ये फूट निर्माण करतात. मी माझ्या काँग्रेस पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करणार नाही. नागरी समाजाने एकत्र राहावे. जात-धर्म असो, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. तर महात्मा गांधी हे सर्वात महान हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते. जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि अतिरेकी जबाबदार आहेत. हिंदू, काश्मिरी पंडित, मुस्लिम, डोगरा यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकावर याचा परिणाम झाला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट
आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला
अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी आणि नाराजी पाहायला मिळतेय. जी २३ नेत्यांची पराभवानंतर दोन वेळा बैठक झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाबद्दल बोलताना आझाद म्हणाले, पक्षाचा अध्यक्ष कोण बनणार हे अध्यक्षपद निवडणुकीतच ठरणार आहे. सध्यातरी अध्यक्षपद रिकामे नाही.