जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे सध्याभारत दौऱ्यावरती आहेत. या भेटी दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांना एक आकर्षक अशी ‘कृष्ण पंखी’ भेट दिली. ही ‘कृष्ण पंखी’ चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आली असून यावर बारीक आणि आकर्षक असे नक्षीकाम केलेलं आहे. ही ‘कृष्ण पंखी’ राजस्थानच्या एका कारागिराने बनवली आहे.
‘कृष्ण पंखी’ ही पारंपारिक हत्यारांचा वापर करून तयार केली आहे. राजस्थानमधील चुरू येथील कुशल कारागिरांनी पंखी घडवली आहे. ‘कृष्ण पंखी’च्या वरच्या बाजूला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तयार करण्यात आला आहे. तसेच त्यावर भगवान कृष्णाच्या विविध मुद्रांचे चित्रण केले आहे. ही संपूर्ण पंखी चंदनाने बनवले असून वापरलेले चंदन हे भारताच्या दक्षिणेकडील जंगलात आढळून येते.
हे ही वाचा:
अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा’
जपानचे प्रमुख म्हणून फुमियो किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या जपानच्या पंतप्रधानांनी भारतात पुढील पाच वर्षांत आणखी ३.२० लाख कोटी रुपयांची (५ ट्रिलियन येन) गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. २०१४ मध्ये जपानने भारतात ३.५ ट्रिलियन येन इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यात आता आणखी वाढ होणार आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.