विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असल्याची काल चर्चा होती. पण, रात्रीतून नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जाणार हे जवळपास निश्चित वाटत असतानाच, रात्री नव्या घडामोडी घडल्या. पटोलेंऐवजी लातूरचे आमदार अमित देशमुख यांचं नाव आता प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर येत आहे. असे झाले तर मग नाना पटोलेंचा आता रोल काय असणार याचीही चर्चा सुरु झालीय.
हे ही वाचा:नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा
राजीनामा दिल्यानंतरही नाना पटोले किंवा कुठल्याच काँग्रेस नेत्याने पटोलेच प्रदेशाध्यक्ष असतील, अशी ग्वाही दिलेली नाही. दिल्लीतूनही अजून पटोलेंच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा झालेली नाही. त्याला जसा उशीर होतोय ते पहाता पटोलेंना मंत्रिमंडळात घेऊन अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची चर्चा आहे. पटोले हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं तर तिघांच्या सरकारमध्ये अडचण होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढं येत आहे.
त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नाना पटोले फसले काय? असा सवाल केला जात आहे.