देशभरात सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राम गोपाल वर्मा यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ट्विट करत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले आहे.
खळबळजनक माहिती असूनही विवेक अग्निहोत्री यांनी मोठ्या धाडसाने समोर आणली आहे, असे राम गोपाल वर्मा म्हणाले. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी बॉलीवूडला पायदळी तुडवून स्वतःच विवेकवूड तयार केलं आहे. जे क्रांतिकारी चित्रपट निर्मात्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देईल. काश्मीर फाइल्सच्या प्रचंड व्यावसायिक यशापेक्षा हा विजय मोठा आहे, अशा शब्दात राम गोपाल वर्मा यांनी विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल
चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर
आजपासून दहावीची परीक्षा; तासभर आधी उपस्थित राहा
पेनड्राइव्ह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न दिल्यामुळे भाजपाचा सभात्याग
११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर आपले अश्रू अनावर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, भाषा सुंबळी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांनी काम केले आहे.