कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्टच्या (एसव्हीजेसीटी) वतीने सलग आठव्या वर्षी ‘डेरवण यूथ गेम्स’ (डीवायजी) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त १४ ते २१ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद, नागपूर तसेच कोकणातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर खेळाडू या क्रीडा महोत्सवात सहभागी होत असतात.
डेरवणमधील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्टच्या क्रीडासंकुलात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. ऑलम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या वॉल क्लाईम्बिंग या प्रकारातही साहसी खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत राज्यभरातील सुमारे सात हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, चषक तसेच एकूण १४ लाखांहून अधिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. ९०० पदके आणि ६० करंडक खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे.
हे ही वाचा:
कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू
फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही
१७ मार्चला होणार नासाचे मेगा मून रॉकेट लॉन्च
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
१२ मार्चपर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी सुरू होती. विविध क्रीडा प्रकारांत ०८ वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत.