25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणदेवेंद्र फडणवीसांची चौकशी हे सुडाचे राजकारणच

देवेंद्र फडणवीसांची चौकशी हे सुडाचे राजकारणच

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. फडणवीसांची चौकशी हे ठाकरे सरकारचे सुदाचे राजकारण असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. लोकांच्या मनात सरकार विरोधात वणवा पेटला आहे आणि हा वणवा या सरकारचा राजकीय बळी घेतला आहे असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला आहे.

काय म्हणाले भातखळकर?
केंद्रीय यंत्रणांनी जी काही कारवाई केली ती न्यायालयाने ग्राह्य ठरवलेली आहे हे त्यांच्या लक्षात आहे की नाही? हे नवाब मलिकांच्या नावाने टाहो फोडत आहेत. एनसीपी आणि विशेषता शिवसेना. पण या नवाब मलिकांवरचे आरोप गंभीर आहेत आणि प्रथम दर्शनी त्यात त्यांचा संबंध आहे हे ईडीच्या न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता म्हणून सुडाचे राजकारण होत नसतं ते न्यायलयात ठरवले जाईल असे भातखळकर म्हणाले

तर हे सरकार फडणवीसांच्या घरी पोलीस कशा करता पाठवत आहे? तर आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार, बदल्यांचा घोटाळा ज्याची माहिती त्यांनी आधीच केंद्रीय गृह सचिवांनी दिली आहे. तर पोलीस काय विचारत आहेत की ही माहिती तुमच्याकडे आली कुठून आली? माहिती कुठून आली हा मुद्दाच नाहीये. त्या माहितीच्या आधारे त्या पोलिस अधिकाऱ्यांना, मंत्र्यांची चौकशी केली गेली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण सरकारने काय केलं?

सीबीआयने राज्य सरकार ऑर्डर दिली की अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. पण या सरकारने स्पेशल वकील नेमले आणि उच्च न्यायालयात गेले. कशाकरता? देशमुखांची चौकशी करू नका म्हणून! भ्रष्टाचाराची चौकशी करू नका असे एखादे सरकार कसे म्हणू शकते. त्याच्या करता विशेष सरकारी वकिल नेमले. करदात्यांच्या पैशातून.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

त्याच्यामुळे हे फडणवीसांच्या विरोधात हे सुडाचे राजकारणच आहे. पण आमचा दामन १००% साफ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही भ्रष्टाचारी लोकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहात. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सरकार विरोधात वणवा पेटलेला आहे आणि हा वणवा तुमच्या महाविकास आघाडी सरकार आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजकीय बळी आणि भ्रष्टाचाराचा बळी घेतल्याशिवाय हा वणवा थांबणार नाही.

या सोबतच ट्विटरच्या माध्यमातूनही भातखळकरांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. “ठाकरे सरकारच्या वसुलीबाज मंत्र्यांच्या विरोधात ठोस पुरावे असताना राज्यात कुठे गुन्हाही दाखल करता येत नाही अशी परिस्थिती आहे. पण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्यांची चौकशी होते. जनता सर्व बघते आहे.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

तर आपल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये भातखळकरांनी ठाकरे सरकारला रम्य डोक्याचे म्हटले आहे. “भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची चौकशी करणारे रेम्या डोक्याचे सरकार महाराष्ट्राला मिळाले आहे” असे ट्विट त्यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा