राज्यात सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय युद्ध रंगलं असून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यावर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला आहे. आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेल्या पैशाची चौकशी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. ३० मार्चला सुनावणी असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
आत्ता अनिल परब चा ही नंबर लागणार.
अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा….चौकशी होणार.
भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/OtvT2rTWBr
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 12, 2022
रत्नागिरीतील दापोली येथे समुद्र किनारी अनिल परब यांचा रिसॉर्ट आणि बंगला आहे. सागरी नियमन कायद्याचे उल्लंघन करून त्यांचे बांधकाम झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी अनिल परब यांच्याकडे पैसा कुठून आला, असा सवाल त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात अनिल परब यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू
आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद
सपाच्या मतांची संख्या वाढली पण भाजपा सरसच!
‘कळसूत्री सरकारच पंचसूत्री अर्थसंकल्प’
किरीट सोमय्यांनी याआधीही अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे समोर आणली होती. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधिकृत बंगले असल्याचा आरोप केला होता. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं होत.