बुधवार, ९ मार्च रोजी भारताकडून चुकून क्षेपणास्त्र अर्थात मिसाईल सोडली गेली आहे आणि ती मिसाईल थेट पाकिस्तानमध्ये जाऊन पडल्याचे समोर आले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याची भारत सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. शुक्रवार, ११ मार्च रोजी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने या संबंधीची अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयच्या खुलाशा नुसार ९ मार्च रोजी या मिसाईलच्या रुटीन मेंटेनन्सचे काम सुरू असतानाच तांत्रिक बिघाड होऊन ही मिसाईल अचानक सुरू झाले आणि पाकिस्तानच्या दिशेने सरसावले. या संपूर्ण घटनेची भारत सरकार मार्फत गांभीर्याने दखल घेतली असून याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी होणार आहे. भारत सरकारने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून या संपूर्ण प्रकारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
हे ही वाचा:
सपाच्या मतांची संख्या वाढली पण भाजपा सरसच!
‘कळसूत्री सरकारच पंचसूत्री अर्थसंकल्प’
ठाकरे सरकारने सादर केला अर्थसंकल्प
देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात
दरम्यान पाकिस्तान कडूनही ही घटना गांभीर्याने घेतली गेली आहे. पाकिस्तानने भारताला असा इशारा दिला आहे की भविष्यात अशा प्रकारची घटना होऊ नयेत. याची काळजी घ्यावी आणि परिणामांची चिंता करावी. पाकिस्तानच्या दाव्यानुसार बुधवार, ९ मार्च रोजी ही मिसाईल आवाजा पेक्षाही तिप्पट वेगाने पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल १२४ किलोमीटर आत घुसले. हे मिसाईल जमिनीपासून चाळीस हजार फुटांवरून प्रवास करत होते. अचानक सुटलेल्या या मिसाईलमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय विमानांना धोका निर्माण झाला होता. तसेच नागरी सुरक्षाही धोक्यात आली होती.