काल पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला. उत्तर प्रदेश मध्ये २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या मतात वाढ झाली आहे. तसेच समाजवादी पक्षाचीही थोडीफार वाढ झाली असली तरी अखिलेश यादव यांच्या मतांची उत्तर प्रदेशमध्ये घसरण सुरु झाली आहे.
२०१७ मध्ये भाजपाने युपीमध्ये ३९ टक्के मते मिळवली होती. तर यावर्षी यामध्ये अजून २ टक्क्यांची वाढ झाली आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये मतांच्या हिश्श्यात इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट जागांच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तर काँग्रेसही युपीमध्ये घसरला आहे.
सपाच्या ३२ टक्क्यांचा मतांचा वाटा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, परंतु भाजपच्या ४१.६ टक्क्यांच्या मतांनी सपाला मागे टाकला आहे. उत्तर प्रदेशच्या निकालांनी अखिलेश यादव यांना पुन्हा संघर्षाचा मार्ग निवडण्याचा जनादेश दिला आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली, पण ही वाढ अखिलेश यांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही.
या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीलाही मोठा झटका बसला कारण २०१७ मध्ये त्यांना २२ टक्के मत झाले होते. त्यावरून २०२२ मध्ये १२ टक्के मते घसरून १० टक्क्यांवर आली आहेत. सर्वात जुना पक्ष म्हणजेच काँग्रेस, ज्याने २०१७ मध्ये ६.३ टक्के मते मिळवली होती. तर यावर्षी थेट ४ टक्क्यांनी घसरून केवळ २.३ टक्के काँग्रेसला मते मिळाली आहेत.
हे ही वाचा:
आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प
‘कळसूत्री सरकारच पंचसूत्री अर्थसंकल्प’
ठाकरे सरकारने सादर केला अर्थसंकल्प
देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात
दरम्यान, भाजपाला बहुमताने विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा लवकरच यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहे.