काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने चार राज्यात बाजी मारली असून, याचा आनंद भाजपा आज साजरा करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे प्रभारी होते. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या फडणवीसांचे आज मुंबईत भाजपाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी फडणवीस त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यावेळी जनतेने भाजपावर दाखवलेल्या विश्वासासाठी, तसेच कार्यकर्त्यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, ” आम्हाला सगळ्यांना चार राज्यातील विजयाचा मनापासून आनंद झाला आहे. या निवडणुकीने सिद्ध केले की, सामान्य माणसाच्या, कष्टकरांच्या मनात अजूनही एकच नेते आहेत. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदीजींच्या नेतृत्वात भाजपाने चार राज्यांमध्ये विजय मिळवला. देशातले सर्वात मोठे २५ कोटी लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशचाही यामध्ये समावेश आहे. २५ वर्षांत पहिल्यांदा एकाच पक्षाने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश जिंकल्याचा पराक्रम केला आहे. ”
शिवसेनेच्या गोव्यातील पराभवावर देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, सेनेची कोणत्याही पक्षाशी लढाई नव्हती तर सेनेने नोटाशी लढत केली आहे. आणि या लढाईत नोटालाही सेनेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. गोव्यामध्ये सेना भाजपच्या प्रमोद सावंत यांना हरवणार असल्याचे प्रचारात सांगत असायचे. मात्र सावंत यांच्या विरोधात सेनेला फक्त ९७ मिळाली आहेत. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाला आहे. आणि ‘मोदी है तो मुमकिन है,’ असेही फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
आणि मुख्यमंत्री योगींनी रचला नवा विक्रम
‘यांना सभागृहात कसं घेतलं?’…’त्या’ आमदारांना बघून भास्कर जाधवांचा तीळपापड
कायद्यानुसार नवाब मलिक यांना मंत्रीपदावरून हटवावे लागेल!
निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम
तसेच विजय झाला म्हणून फक्त आनंद साजरा करत बसू नका असे आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ते म्हणाले,” विजयाचा आनंद एक दिवस असतो. आम्ही तो साजरा केला. आज रात्रीपासून पुन्हा एकदा कामाला लागू. ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दलित आदिवासी यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारविरोधात पुन्हा संघर्ष सुरू होईल. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराच्या विळखण्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडू.”