देशातील पाच राज्यांच्या विधासभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. यामधये उत्तर प्रदेशच्या १८ व्या विधानसभेच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांदा युपीमध्ये अखंडपणे सत्ता स्थापन करण्याची जनतेने संधी दिली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही हा निकाल ऐतिहासिक आहे. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत.
१९५२ मध्ये उत्तर प्रदेशात पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. विधानसभा २०२२ च्यावेळी या निवडणुकीला ६९ वर्षे झाली आहेत. या काळात सुमारे २५ वर्षांनी एखादा नेता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे.
२०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाने प्रचंड मतांनी विजयी झाल्यावर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी यूपी मध्ये अनेक उल्लेखनीय कामे केलीत. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी यूपी मधील अवैध कत्तलखाने बंद केली. महत्वाचे काम म्हणजे महिला,मुलींची छेड काढणाऱ्यांविरुद्ध अँटी रोमिओ मोहीम राबवण्यात आली. तसेच त्यांनी राज्यांतील माफियांविरुद्ध मोहीम राबवली.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग
निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम
पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!
मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मुख्यमंत्री चन्नी यांना केले पराभूत
१९९८ मध्ये योगींनी राजकारणात पाऊल टाकले. तेव्हापासून सलग पाच वेळा ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला. २०२२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. युपीच्या जनतेने सलग दुसऱ्यांदा भाजपावरच आपला दृढ विश्वास दर्शवला आहे. भाजपाने आपल्या मित्रपक्षांसह दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे.