भाजपाचे नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘गोवा और युपी मे म्यांव म्यांव कि आवाज नाही सुनाई दियी’ असे ट्विट करत राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आज निकाल लागले. यामध्ये पाच पैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टी जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला उखडून आपने सत्ता काबीज केली आहे. या पाच राज्यांपैकी गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका शिवसेना लढली होती.
हे ही वाचा:
देवभूमीत ऐतिहासिक निकाल! पुन्हा भाजपाच
गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?
गोव्यातील भाजपाच्या यशाचे श्रेय जनतेचे
पण या दोन्ही राज्यात शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही. उलट शिवसेनेचे डिपॉझीट जप्त झाले. नोटापेक्षा कमी मते शिवसेनेला मिळाली. यावरून शिवसेनेची सर्वच जण खिल्ली उडवत आहेत. गोव्यात तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी गोव्यात जाऊन प्रचारही केला होता. तरी देखील त्याचा काहीच फायदा झाला नाही.
या निकालानंतरच राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. ‘गोवा और युपी मे म्यांव म्यांव कि आवाज नाही सुनाई दियी’ असे खोचक ट्विट राणेंनी केले आहे. या आधीही हिवाळी अधिवेशनावेळी आदित्य ठाकरे जात असताना नितेश राणेंनी म्यांव म्यांव आवाज काढत त्यांना डिवचले होते. त्यानंतर पुन्हा आता त्यांनी शिवसेनेची कळ काढली आहे.
Goa aur UP mein “Meow Meow” ki awaj nahi sunaee Di bhai..
Very sad..
bahut dukh hua!!— nitesh rane (@NiteshNRane) March 10, 2022