पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाची पायाभरणी २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी केली होती. उद्घाटनानंतर १२ किमीचा विभाग रविवारी कार्यान्वित झाला असून उर्वरित २१ किमीचा भाग मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
या मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. पुण्याचा सार्वजनिक वाहतुकीचा वाटा १२ टक्के आहे आणि त्यात देशातील सर्वाधिक दुचाकी लोकसंख्या आहे. त्यामुळे पुण्यातील मेट्रोचे रोजचे प्रवासी हळूहळू सहा लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या पुणे मेट्रो प्रकल्पाची एकूण किंमत ११ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.
या मेट्रोची काय आहेत खास वैशिष्ट्य?
पुणे मेट्रोचे डबे एल्युमिनियम बॉडीने बनवलेले आहेत ज्याचा फायदा पारंपारिक स्टेनलेस स्टीलच्या डब्यांपेक्षा ६.५ टक्के हलका आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणांतर्गत पुणे मेट्रोचे डबे स्वदेशी बनवले आहेत. डब्यांचे स्वदेशी घटक ७० टक्क्यांहून अधिक आहेत.
तसेच पुणे मेट्रोने सुरुवातीपासूनच उन्नत स्टेशन्स आणि डेपोच्या छतावर ११.१९ MWp सौर ऊर्जा निर्मितीची तरतूद केली आहे. निर्माण होणारी उर्जा स्थानकांवर आणि गाड्या चालवण्यासाठी ट्रॅक्शन पॉवरमध्ये वापरली जाणार आहे. यामुळे वार्षिक वीस कोटी रुपयांची ऊर्जा बचत होणार आणि सुमारे २५ हजार टन CO2 उत्सर्जन रोखले जाणार आहे.
हे ही वाचा:
जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम
शिवसेना नेते संजय कदम यांच्यावर आयकर विभागाची धाड!
कोण आहे हा बजरंग खरमाटे? आमदार भातखळकरांनी विचारला सवाल
RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड
महत्वाचे म्हणजे बांधकामासाठी जागेची कमतरता असल्याने मंडई आणि बुधवार पेठ या दोन मेट्रो स्थानकांची रचना एनएटीएम या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. या एनएटीएमच्या वापरामुळे सुमारे दोनशे रहिवाशांचे पुनर्वसन टळले आहे.