31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाको-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी एनएसईच्या चित्रा रामकृष्ण यांना अटक

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी एनएसईच्या चित्रा रामकृष्ण यांना अटक

Google News Follow

Related

‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’च्या (एनएसई) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना रविवार, ६ मार्च रोजी रात्री केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक कारण्यात आली आहे. एनएसईतील को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी चित्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतून त्यांना अटक करण्यात आली आहे.

चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या कार्यकाळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवल्याचे सेबीकडून सांगण्यात आले होते. तसेच शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे.

चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रह्मण्यम यांची मुख्य सल्लागार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून आनंद सुब्रमण्यम यांची नेमणूक केली होती. ही नेमणूक बेकायदा असल्याचा आरोप चित्रा यांच्यावर करण्यात आला होता. चित्रा यांच्या निर्णयांवर कथितपणे प्रभाव पाडणारे रहस्यमय ‘हिमालयन योगी’ म्हणजेच आनंद सुब्रमण्यम असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ते देखील एनएसईचे माजी अधिकारी असून त्यांना मार्केट मॅनिप्युलेशन प्रकरणात अटक करण्यात आली होती.

गेल्या २० वर्षांपासून चित्रा या संबंधित योगीच्या संपर्कात होत्या. विशेष म्हणजे त्या संबंधित योगीला कधीही भेटल्या नाहीत, अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चित्रा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने नुकताच त्यांचा अर्ज फेटाळला होता.

हे ही वाचा:

मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

रशियाला युद्ध ‘महाग’ पडेल?

चित्रा यांच्यापूर्वी एप्रिल १९९४ ते मार्च २०१३ पर्यंत नरेन हे एनएसईचे एमडी आणि सीईओ होते. नरेन यांच्या कारकीर्दीनंतर चित्रा रामकृष्ण यांची एनएसईमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगिरीमध्ये उपाध्यपदी नियुक्ती झाली होती. या प्रकरणाविषयी सेबीने मोठी कारवाई करत चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासोबतच काही व्यक्तींवर ठपका ठेवलेला. याप्रकरणी सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी, आनंद सुब्रह्मण्यम व एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नरीन यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा