श्रद्धेच्या बळावर जग जिंकता येऊ शकेल, असे म्हटले जाते. गणपती दूध पितो, नंदी पाणी पितो अशा घटना अधूनमधून कुठे ना कुठे घडतच असतात. अशीच घटना महाशिवरात्री दिवशी राज्यभर महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी आणि दूध पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली. आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे पहिला प्रकार समोर आला. नंतर मग अनेक ठिकाणी नागरिकांनी तसा प्रयत्न केला असून नंदी पाणी पीत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. प्रत्येक जण मंदिरात जाऊन नंदीला दूध पाणी पाजू लागला होता.
नुकतीच महाशिवरात्री पार पडली त्यानिमित्ताने असा एक प्रकार समोर आला. महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती गावभर पसरली. नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले. जळगाव शहरालगत असलेल्या शिरसोली गावातील एका मंदिरात हा प्रकार सकाळी १० वाजता सुरु झाला. नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याने पाणी पाजून पाहिले. एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी पिऊ लागला सर्वजण मग हा प्रयोग करून पाहू लागले.
राज्यभर लालसगाव, बुलढाणा, नाशिक एवढेच नाही मुंबईमधील नालासोपारा येथेही हा प्रयोग करून बघण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेच्या ओसवाल नगरी येथे असलेल्या शिव मंदिरात अनेक भक्तांनी नंदी बैलाला दूध पाजयण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे.
हे ही वाचा:
‘रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचे होणारे नुकसान युवा सेनेने भरुन द्यावे’
भारताने कसोटी जिंकली; श्रीलंकेवर एक डाव २२२ धावांनी विजय
मराठीसोबत पाच भाषा शिकण्याचा संकल्प करा!
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे एक विज्ञान आहे असे सांगण्यात आले आहे. जेव्हा मूर्तीच्या तोंडाला चमच्याने दूध पाजले जाते त्यावेळेस सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय तणाव या शास्त्र नियमानुसार दूध मूर्तीकडे खेचले जाते आणि नंतर जमिनीवर येते. असे डॉ. संदीप खैरनार, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मालेगाव यांनी सांगितले आहे. आणि नंदी दूध पितो हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगत सिद्ध करून दाखविले तर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.