पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले असताना त्यात राज्यपालांवरचा राग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींसमोरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांची तक्रार पंतप्रधानकडे केली आहे. पवार म्हणाले, ” सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे. ”
पवार यांनी व्यासपीठावरून थेट उल्लेख न करता राज्यपालांबद्दल वक्तव्य केले. ” राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत केली जात आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला पटलेल्या नाहीत, मान्य नाहीत. शिवाजी महाराज, जिजाऊंनी हे राज्य स्थापन केलं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी सत्यशोधक विचार माडंले. त्यांच्या विचारांचा मोठा वारसा आहे. त्याचे पालन केले पाहिजे. याबद्दल मनात आकस न ठेवता त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे. तसेच विकास कामांत राजकारण न करता महामानवांचे विचार पुढे न्यायचे आहेत,” असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
हे ही वाचा:
भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात
‘सामना’च्या पुणे आवृत्तीतील नरेंद्र मोदींच्या जाहिरातीची चर्चा
‘सामना’च्या पुणे आवृत्तीतील नरेंद्र मोदींच्या जाहिरातीची चर्चा
मराठीसोबत पाच भाषा शिकण्याचा संकल्प करा!
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या तक्रारीकडे फारसे लक्ष दिलेले दिसले नाही. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून केली.