पंजाबमधील अमृतसर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) मेसवर गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये सहा जवान ठार झाले असून काही जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविवार, ६ मार्च रोजी अमृतसरमधील खासा गावातील बीएसएफच्या मेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका कॉन्स्टेबलनेच हा अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव एस. के. सत्तेप्पा आहे. रविवारी सकाळी अचानक सत्तेप्पा याने मेसमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दरम्यान अचानक घडलेल्या प्रकारामुळे मेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्यामध्ये सत्तेप्पासह पाच जवान ठार झाले, तर १२ जवान जखमी झाले. जखमी जवानांपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या सत्तेप्पा याने स्वतःवर देखील गोळी झाडली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण
‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास फेटा
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत असून अद्याप गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.