रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यात आले आहे. पण या संघर्षामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून परतावे लागले आहे. त्यामुळे आता उर्वरीत शिक्षणाचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.
ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग (FMGL) ऍक्टमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार, युक्रेनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार आहे.
आतापर्यंतच्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग (FMGL) ऍक्ट नुसार, विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्सचा पूर्ण कालावधी तसेच ट्रेनिंग आणि इंटर्नशिप भारताबाहेरच करावी लागत होती. मात्र युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता केंद्र सरकारने यात काही बदल केले आहेत. आता परतलेले हे मेडिकलचे विद्यार्थी भारतात इंटर्नशिप पूर्ण करू शकतात. इंटर्नशिप पूर्ण करण्याचा अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना FMGI ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!
अहवालानुसार, चीन आणि युक्रेनमधून आलेल्या जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना FMPL ऍक्टमधील बदलाचा लाभ मिळू शकतो. कोविड- १९ महामारीमुळे चीनमधूनही अनेक मेडिकलचे विद्यार्थी भारतात परतले आहेत. युक्रेन आणि चीनमधून ज्या कारणांमुळे हे विद्यार्थी परत आले, ती कारणे विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांची समस्या लक्षात घेता, हे विद्यार्थी भारतातून इंटर्नशिप पूर्ण करू शकतील, असा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.