भारत सरकारने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पावले उचलल्यानंतर आता काँग्रेसच्या काळात २०११मध्ये लिबियातून कसे १८ हजार भारतीयांना सुरक्षित आणले गेले याचे कौतुक करताना काँग्रेस समर्थक नेटकरी थकत नाहीत. आताच्या रशिया-युक्रेन युद्धात भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात अपयशी ठरत असल्याची बतावणी करत काँग्रेसने खोटे दाखले द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक नमुना आहे तो लिबियातून भारतीयांची सुटका.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची मोहीम सुरू असताना काँग्रेसने या मोहिमेला पाठिंबा देण्याऐवजी विद्यार्थी कसे त्रस्त आहेत याच्या कहाण्या व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लिबियातून सुटका केलेल्या भारतीयांचे दाखले दिले जात आहे. २६ फेब्रुवारीला मणिकम टॅगोर यांनी ट्विट करत म्हटले होते की, मनमोहन सिंग सरकारने २०११मध्ये १५ हजार ४०० भारतीयांची सुटका लिबियातून केली होती. एवढेच नव्हे तर नेपाळी आणि बांगलादेशी नागरिकांचीही सुटका केली. केरळ काँग्रेसने त्यानंतर ट्विट केले होते की, मनमोहन सिंग यांच्या काळात १६ हजार भारतीयांची लिबियातून सुटका करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी या आकडेवारीत भर घालताना म्हणतात की, मनमोहन सिंग सरकारने १८ हजार भारतीयांना लिबियातून भारतात सुरक्षित आणले होते. या तिन्ही ट्विटमध्ये भारतीयांच्या आकडेवारीत एकसमानता नाही, हे विशेष.
हे ही वाचा:
‘शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही’
हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, सपा नेते काशी विश्वनाथ मंदिरात
फिरकीचा जादुगार शेन वॉर्न यांचे निधन; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का
युक्रेनचे सर्वात मोठे मालवाहू विमानही हल्ल्यात उद्ध्वस्त
पण त्याकाळी आलेल्या बातम्यांचा आधार घेतल्यावर लक्षात येते की, तत्कालिन भारत सरकारने अत्यंत संथगतीने भारतीयांची सुटका केली होती. त्यावेळी चीन, अमेरिका यांनी आपल्या नागरिकांना झटपट मायदेशी नेले होते. पण तत्कालिन यूपीए सरकारने १ मार्च २०११पर्यंत केवळ ४५०० भारतीयांची सुटका केली होती. तेव्हाच्या इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती की, एकीकडे भारतीयांची सुटका संथगतीने होत असताना इतर प्रमुख देशांनी मात्र आपल्या नागरिकांना सुरक्षित आपल्या घरी आणलेदेखील.तेव्हा राज्यसभेतील खासदारांनीही मनमोहन सरकारच्या संथ कारभारावर टीका केली होती.
यावेळी भारताने पहिले विमान २६ फेब्रुवारी २०२२ला युक्रेनला पाठवले आणि २१९ विद्यार्थ्यांची सुटका केली. तर चीनने आपली विमाने २८ फेब्रुवारीला पाठविली.