25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषफिरकीचा जादुगार शेन वॉर्न यांचे निधन; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

फिरकीचा जादुगार शेन वॉर्न यांचे निधन; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियाचे जादुई फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे शुक्रवारी निधन झाले. अवघ्या ५२व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्राणोत्क्रमण झाले. विक्रमवीर फिरकी गोलंदाज म्हणून स्वतःची जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे शेन वॉर्न यांचे निधन झाल्यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

थायलंड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. तिथे त्यांच्या खोलीत ते पडलेले होते. कोणताही प्रतिसाद ते देत नव्हते. त्यांची तपासणी केल्यानंतर ते मृत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळविण्यात आली असून सध्या तरी यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

शेन वॉर्न हे आपल्या जादुई फिरकीसाठी ओळखले जात. फलंदाजाला कमकुवत लेखत त्यांची गोलंदाजी करण्याची पद्धत विशेष अशीच होती. मनगटी गोलंदाजी करण्यात त्यांचा हात धरणारा गोलंदाज त्या काळात नव्हता. वॉर्नी या टोपणनावाने ते ओळखले जात असत. ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी १९९२ ते २००७ या कालखंडात प्रतिनिधित्व केले. स्थानिक क्रिकेटमध्ये व्हिक्टोरियाकडून ते खेळत. कसोटी क्रिकेटमध्ये १४५ सामन्यांत त्यांनी ७०८ बळी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांनी हा विक्रम मोडित काढला. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी १९४ सामने खेळत २९३ बळी घेतले होते. शेन वॉर्न यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३१५४ धावाही केल्या होत्या पण त्यात एकही शतक त्यांनी ठोकले नाही. १२ अर्धशतके त्यांच्या नावावर होती.

हे ही वाचा:

‘शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही’

युक्रेनचे सर्वात मोठे मालवाहू विमानही हल्ल्यात उद्ध्वस्त

हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, सपा नेते काशी विश्वनाथ मंदिरात

पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

 

१९९३मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेसाठी वॉर्न यांची निवड झाली आणि त्या सहा सामन्यांच्या मालिकेत त्यांनी ३४ बळींचा विक्रम केला. त्यात इंग्लंडच्या माईक गॅटिंग यांचा वॉर्न यांनी उडवलेला त्रिफळा हा शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून गौरविला गेला होता. लेगस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू गॅटिंग यांच्या पायातून यष्टीवर आदळला होता. त्या वर्षी सर्वाधिक ७१ बळी त्यांनी घेतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा