पीडित व्यक्तीची ईडीकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर जमिनीवर कब्जाची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात खुद्द पीडित व्यक्तीनेच ईडीकडे तक्रार दिली आहे.
मुंबईमधील बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील एका भूखंडावर मलिक यांनी कब्जा केल्याची माहिती समोर आली आहे. गोवावाला कंपाउंड बीकेसी येथील २०० कोटींच्या जमिनीवर कब्जा करण्यात मलिक यांचा हात आहे. याबाबत कुर्ला परिसरातील एका जमिनीवर नवाब मलिक यांनी बेकायदेशीर कब्जा केल्याची तक्रार देणाऱ्या पीडित व्यक्तीने मलिकांवर धक्कादायक आरोप केला आहे.
मलिकांच्या समर्थकांनी त्या पीडित व्यक्तीला धमकावले होते. त्यावर त्या व्यक्तीने घडलेला प्रकार मलिकांना सांगितला. त्यावर त्या व्यक्तीला, ‘क्यू बाप दादा के प्रॉपर्टी को लेकर दिमाग खराब कर रहे हो’ अशा अर्वाच्य शब्दात मलिकांनी त्या व्यक्तीला फटकारले. हे त्या पीडित व्यक्तीने ईडीकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी
ईडीने रिमांड अर्जामध्ये, नवाब मलिक हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या ताकदीचा वापर करून ते त्यांनी कब्जा केलेल्या जमिनीचे पुरावे नष्ट करू शकतात. तसेच जामीन मिळाल्यास ते दुसऱ्या संशयित आरोपीला अलर्ट करू शकतात म्हणून त्यांना सध्या कोठडीतच ठेवण योग्य आहे. त्यामुळे २३ फेब्रुवारीला मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यावर आठ दिवसांची त्यांना ईडी कोठडी सुनावली होती. त्या कोठडीत ईडीने आता चार दिवसांची वाढ केली आहे.