आर्यन खान हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असे एनसीबीच्या विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, एनसीबी डीडीजी संजय सिंग यांनी याबाबतीत खुलासा केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण म्हणजे पीआरचा फंडा असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो.
आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज आढळले नसल्याचे वृत्त खोटे आहे. या वृत्ताला एनसीबीकडून अधिकृत दुजोरा नसल्याचे एनसीबी डीडीजी संजय सिंग यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून यावर इतक्यात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता असे चॅट्स सुचवत नाहीत. एनसीबी मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता, असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त येताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली होती. मात्र, आता हे वृत्त खोटे असून असा कोणताही अहवाल समोर आलेला नाही, हे उघड झाले आहे.
हे ही वाचा:
‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’
ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित
विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने
संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना
कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाई दरम्यान आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची जामिनावर सुटका झाली होती. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला होता. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही नवाब मलिक यांनी आरोप केले होते.