विरोधी पक्षातील नेते सुडाच राजकारण करत केंद्रीय यंत्रणांचा वापर सत्ताधारी नेत्यांवर करत असल्याचा आरोप ठाकरे सरकार करत असतानाच त्यांच्याच सूडबुद्धीने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
दिशा सालियन हिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणेंना ३ मार्च रोजी, तर नारायण राणेंना ४ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नाही; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा अहवाल
फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन १,३३,०२६ कोटी रुपये
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला असून त्यात दिशाच्या पोस्टमार्टम अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याची नोंद आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती.