रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सध्या युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, युक्रेनची मानवतावादी गरज लक्षात घेता भारत आता युक्रेनची मदत करणार आहे.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, ‘युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेत भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत मंगळवारी युक्रेनला पाठवण्यात येईल.’ युक्रेनमधील घडामोडींबद्दल भारत चिंतेत आहे. हिंसाचार तात्काळ संपवण्यात यावा अशी आमची तातडीची मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
India to provide urgent relief supplies, including medicines, to Ukraine
Read @ANI Story | https://t.co/tfAnVHLGxL#UkraineConflict #Ukraine #India pic.twitter.com/XmByL2FrZc
— ANI Digital (@ani_digital) February 28, 2022
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, ‘युक्रेनच्या सीमेवरील मानवी संकटाचा सामना करण्यासाठी मदतसामग्रीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी मदत मागितल्यानंतर भारताने मदत पुरवठ्याची पहिली खेप पाठविण्याची घोषणा केली आहे.’
हे ही वाचा:
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला
महाशिवरात्री पूजेचे महत्त्व; काय असतात विधी?
मागण्या मान्य झाल्याने छत्रपती संभाजी राजे यांचे उपोषण मागे
डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय नागरिक अडकले असून त्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी भारतीयांच्या सुखरूप सुटकेसाठी चर्चा केली होती. यावर पुतीन यांनी सकारात्मकता दाखवली होती. तसेच दोन्ही देशांनी संघर्ष टाळून चर्चेने प्रश्न सोडवावेत असा सल्ला देखील दिला होता. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून संघर्षावर चर्चा केली होती. त्यांनाही नरेंद्र मोदींनी चर्चा करून प्रश्न सोडवावा हाच सल्ला दिला होता.