25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामामालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला

Google News Follow

Related

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नियमित सुनावणी होती. हा साक्षीदार आरोपी क्रमांक ६,९,११ शी संबंधित होता. तर आतापर्यंत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अठरा साक्षीदार फितूर झाले आहे. पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी एनआयएकडे आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत २२० जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यातील १८ साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, सुधाकर द्विवेदी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी आदींचा या प्रकरणात सहभाग आहे. या आरोपींची सुनावणी सुरू झाली तेव्हा तपास यंत्रणा एनआयएने २८६ साक्षीदारांची यादी जारी केली होती. ज्यामध्ये डॉक्टर, पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ञ इ. होते.

एनआयएने सांगितले की, जो साक्षीदार त्याच्या वक्तव्यापासून फितूर झाला आहे, तो मध्य प्रदेशचा आहे. जो हॉटेल व्यावसायिक आहे. या साक्षीदाराने आरोपींना ओळखण्यास नकार दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मागण्या मान्य झाल्याने छत्रपती संभाजी राजे यांचे उपोषण मागे

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

News Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात

सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. नमाजा नंतर मशिदीत मोटार सायकलवर बॉम्बस्फोट झाला यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे गेले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा