युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धात नवनवीन वळणे येताना दिसत आहेत. सोमवार २८ फेब्रुवारी रोजी या युद्धात आता बेलारूस हा देशही उतरताना दिसत आहे. बेलारूसने युद्धात थेट सहभाग नोंदवला नसला तरीही रशियाला सहाय्य करणारी भूमिका घेण्याचा निर्णय केला आहे. बेलारूसने आपल्या देशात अण्विक क्षेपणास्त्र ठेवायची परवानगी रशियाला दिली आहे. त्यामुळे या युद्धात नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
बेलारूसने आपल्या संसदेत एक अधिकृत ठराव पारित करून आपले नॉन न्युक्लिअर स्टेटस मागे घेतले आहे. याचा अर्थ असा की अण्वस्त्रांना समर्थन न करण्याची भूमिका बेलारूसने बदलली आहे. हा ठराव पारित केल्यानंतर बेलारूसने रशियाला अण्वस्त्रांचा मारा करण्यासाठी आपली भूमी वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता रशिया बेलारुसमधूनही युक्रेनवर आक्रमण करू शकतो.
हे ही वाचा:
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी
युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त
युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर रशिया, युक्रेन आणि बेलारूस या तिन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. या तिन्ही देशांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे या युद्धात बेलारुसची भूमिका महत्वाची मानली जात आहे. बेलारूसने जरी रशियाला आपली भूमी वापरायची परवानगी दिली असली तरी आता बेलारूस हा या युद्धात मध्यस्थाच्या भूमिकेत दिसणार आहे. बेलारुसमध्ये युक्रेन आणि रशियाचे प्रतिनिधी शांतिवर्ता करताना दिसणार आहेत. त्यामुळे रशिया – युक्रेन युद्धात बेलारुसची भूमिका महत्वाची ठरणार आहे.