टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता रवी दहियाने (२३) इस्तंबूल येथे यासर डोगू रँकिंग मालिकेत ६१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुर्वपदक जिंकले आहे.
रवी दहियाने उझबेकिस्तानच्या गुलोमजोन अब्दुल्लाएवचा ११-१० असा पराभव केला आहे. अब्दुल्लाएवविरुद्ध ८-१० असा पिछाडीवर पडल्यानंतर दाहियाने शेवटच्या क्षणी लढत जिंकली आहे. याआधी रवीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणच्या मोहम्मदबाघेर इस्माईल याख्केशीवर विजय मिळवला होता. त्याच्याशिवाय कुस्तीपटू दीपक पुनियाने ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक फेरीत कझाकस्तानच्या एलखान असाडोव्हचा ७-१ असा पराभव केला. तर अमनने ५७ किलो गटात आणि ज्ञानेंद्रने ६० किलो गटात कांस्यपदक जिंकले आहे.
रवीला टोकियो येथे पुरुषांच्या फ्रीस्टाइल ५७ किलो वजनी गटाच्या विजेतेपदाच्या लढतीत गतविजेत्या जावूर उगुएवकडून पराभव पत्करवा लागला होता. त्यावेळी रवी दहिया ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला होता. तथापि,दहिया त्यावेळी आपल्या रौप्य पदकावर समाधानी नव्हता कारण त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकायचे होते. तेव्हा रवी दहिया म्हणाला होता, “मला रौप्यपदक मिळाल्याचा आनंद आहे. पण मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. मी सुवर्ण जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण थोड्या फरकाने ते हुकले.”
हे ही वाचा:
युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचा भाजपामध्ये प्रवेश
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त
नूर सुलतान मधील २०१९ च्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याच्या प्रयत्नात टोकियो गेम्ससाठी पात्र ठरल्यानंतर रवी प्रसिद्ध झोतात आला होता. रवीने नहारी गावातील हंसराज ब्रह्मचारी आखाड्यात कुस्तीला सुरुवात केली होती. नंतर तो नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये स्थलांतरित झाला. नहारी गावात कुस्तीपटू महावीर सिंग आणि अमित कुमार दहिया या दोन ऑलिम्पिक कुस्तीपटूंचे घर आहे.