दक्षिण आणि मध्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांचा रविवार फारच त्रासाचा जात आहे. कारण ऐन रविवारच्या सकाळीच या भागातील बत्ती गुल झाली आहे. टाटा पॉवर येथुन होणारा वीजेचा पुरवठा ट्रिपींगमुळे बंद पडला आहे.
सध्या हा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘बेस्ट’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. बेस्टच्या माध्यमातून असे सांगण्यात येत आहे की, “टाटा येथील ग्रीड फेल्युअर मुळे सायन, माटूंगा, परेल, दादर, भायखळा, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागातील वीज परवठ पूर्णपणे खंडीत झाला आहे. तर तो पूर्ववत करण्यासाठी काम सुरू आहे.”
एमएसईबीची २२० केव्ही ही मुलूंड-ट्रॉम्बे येथील ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्याने दक्षिण आणि मध्य मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी, झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर भारताची ही भूमिका
‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तिकेचे प्रकाशन
नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर ठाकरे सरकारचा सूड
फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात
मुंबईतील बेस्ट कंपनीचा वीज पुरवठा वगळता अदानी, टाटा पॉवर, महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे. मुंबई शेजारील नवी मुंबई, ठाणे परिसरातही वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे.