31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?' या पुस्तिकेचे प्रकाशन

‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तिकेचे प्रकाशन

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त मुंबई धर्मरक्षा मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर मुंबईतील मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबीयांवर होणारे अत्याचार आणि त्यांचे त्या विभागातून होणारे पलायन यावर आधारित ‘मुंबई सुरक्षिततेच्या उंबरठ्यावर’ या पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले आहे. महामंडलेश्वर परमपूज्य श्री. विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. तर या प्रकाशन समारंभाला मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे यांची विशेष उपस्थिती होती. प्रकाश गाडे यांनी या पुस्तकाचे लिखाण केले असून विराट प्रकाशनाच्या माध्यमातून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे.

या पुस्तिकेत मुंबईतील वस्त्यांमधील भेदभाव, मालाड मालवणीतील हिंदूंची स्थिती तसेच मालाड मालवणीमध्ये तुष्टीकरणाचा प्रयत्न या सर्व विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई येथील मुंबई बॉम्ब ब्लास्ट शहीदांचे स्मारक सेंचुरी मार्केट समोर हे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना विश्वेश्वरानंदजी महाराज म्हणाले की, “सत्तेसाठी संस्कृतीशी तडजोड करू नये, मी राजकीय व्यक्ती नाही, पण जेव्हा-जेव्हा हिंदू धर्माला ज्या ज्या ठिकाणी त्रास दिला गेला किंवा विरोध केला गेला. तेव्हा तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम आम्ही केले. वीर सावरकरांचे स्मरण करून देत ते म्हणाले की, आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे सर्व हिंदूंनी समाजासाठी लढले पाहिजे.”

पुस्तकाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, हे केवळ पुस्तक नसून हिंदूंवरील अत्याचाराची सत्यकथा आहे, त्यामुळे हिंदू समाज जिवंत ठेवायचा असेल तर हिंदूंना जागृत राहावे लागेल. यासोबतच आपली संस्कृती वाचवण्यासाठी प्रत्येकाला लढाई लढावी लागणार आहे, असे मत महामंडलेश्वर परमपूज्य विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर ठाकरे सरकारचा सूड

फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात

‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल

उत्तर प्रदेशमधून ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा

पुढे बोलताना विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज म्हणाले की, मुंबईत असा एक समाज आहे की, ज्यांच्या लाऊडस्पीकरने जनतेला त्रास होतो पण कोणी काही बोलत नाही. आवाज उठवल्यास तो आवाज दाबला जातो पण जर आपल्या मंदिरातील घंटा वाजली की आजूबाजूचे लोक विरोध करतात. हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या विचारधारेवर जगणारे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आज त्या गोष्टी आणि त्यांची विचारधारा विसरले आहेत याचा शिवसेनेने विचार करावा अशी टीका महामंडलेश्वर परमपूज्य श्री. विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी केली.

तर आमदार नितेश राणे म्हणाले की, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांना, विशेषतः हिंदू महिलांना असुरक्षित वाटत आहे. १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांची आठवण करून देत नितेश राणे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई सुरक्षित राहिली नसती, तर त्या काळात हिंदूंचे काय झाले असते हे कोणीही सांगू शकत नाही. पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांची शिवसेना आता उरली नाही कारण ज्या विचारधारेला आणि पक्षाला बाळासाहेब ठाकरे विरोध करत होते, आज त्यांचाच पक्ष आणि त्याच विचारधारेने त्यांचे पुत्र सरकार चालवत आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदूंना जागृत व्हावे लागेल, अन्यथा विशिष्ट समाज भविष्यात राज्य करू लागेल, अशी खंत नितेश राणे यांनी व्यक्त केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा