29 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरक्राईमनामामंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटातील व्यक्तीकडून जमीन का घेतली?

मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटातील व्यक्तीकडून जमीन का घेतली?

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या व्यक्तीकडून जमीन का खरेदी केली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

फडणवीस म्हणाले की, हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएने ईडीने जी ऑपरेशन्स केली त्यात एक लिंक मिळाली ती कशापद्धतीने दाऊद भारतात रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिग करतो आहे. हे व्यवहार मनीलॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत आहेत. यासंदर्भात ईडीने ९ ठिकाणी सर्च केले हे ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या त्यातील एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. विशेषतः नवीब मलिक यांनी जी जमीन घेतली ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान व सलीम खान जो हसिना पारकरचा उजवा हात आणि हसिना पारकरचा फ्रंट मॅन ओळखला जातो, त्याच्याकडून ही जमीन घेतली.

फडणवीसांनी सांगितले की,  ईडीने म्हटले की जमिनीच्या मालकांना एकही पैसा मिळालेला नाही. त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ ऍटर्नी दिली पण ते बदलून हा व्यवहार झाला. हे पण लक्षात आले आहे जे २५ लाख दिल्याचे दाखविले जात आहे ते एकही पैसा मिळालेला नाही. ज्याठिकाणी यांसंदर्भात ज्या ठिकाणी सौदे झाले तिथे हसिना पारकर येत होती आणि सौदा करत होती. त्यासंदर्भात तिथल्या लोकांनी जबाब दिला आहे. हा व्यवहार झाला आणि पारकरला ५५ लाख देण्यात आले, त्याचे पुरावे ईडीकडे आहेत. एकूण या व्यवहारात कशापद्धतीने जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकना मिळाली आणि ते पैसे अंडरवर्ल्डला कसे गेलेय मनी लॉन्ड्रिंगचा अँगल जो आहे, तो स्पष्ट झाला आहे.

प्रश्न एवढाच उपस्थित होतो, एखाद्या मंत्र्याने किंवा मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुबई बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या व्यक्तीकडून जमीन का घएतली, ती त्याची जमीन नसताना का विकत घेतली, हसिना पारकरशी व्यवहार करण्याचे कारण काय. हे व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले. जे मुंबईत बॉम्बस्फोट करतात त्यांच्या व्यवहारातून जर आपण पैसे देणार असू तर ते निंदनीय आहे. म्हणून ईडीने ही कारवाई केली.

हे ही वाचा:

‘नवाब मलिकांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये’

‘डी’ गँगची जमीन नवाब मलिकांच्या कंपनीच्या नियंत्रणात!

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

परीक्षा तोंडावर आलेल्या असताना बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

 

फडणवीस म्हणतात, ईडीने सांगितले की, बॉम्हस्फोटातील आरोपींचे जबाब नोंदविले आहेत. मूळ मालक आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला एकही पैसा मिळाला नाही. ही कारवाई केली आहे ती नियमानुसार आहेत. टेरर फंडिंगचा अँगल स्पष्ट दिसतो आहे. अशाप्रकारे दाऊद जो देशाचा मोठा शत्रू आहे. त्याचं समर्थन कसं केलं जाईल. म्हणूनच या प्रकरणाचे राजकारण न करता जर टेरर फंडिंग होत असेल आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून संगमनत करून जमिनी घेतल्या जात असतील, तो पैसा दाऊद, हसिनाकडे जात असेल. तर याचा निषेध केला पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा