भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या दहिसर ते अंधेरी या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करावे यासाठी हे पत्र पाठवण्यात आले आहे. यावेळी ‘मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका..’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व आणि दहिसर पश्चिम – अंधेरी पश्चिम या मेट्रो मार्गिकांच्या उद्घाटनाकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे या संबंधीचे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले असल्याचे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे. मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंड: गाडी दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’
‘समीर वानखेडे बार परवाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी घाई कशाला?’
त्याचबरोबर मुंबई शहराचे मेट्रो प्रोजेक्ट्स सुरु करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विशेष अतिथी म्हणून बोलवावे अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या मेट्रो प्रोजेक्ट्सचे उदघाटन आपल्या कार्यकाळात करताना फडणवीसांना न बोलावता कोट्या मनोवृत्तीचे प्रदर्शन महाराष्ट्राला करून देऊ नका असा चिमटाही यावेळी भातखळकरांनी काढला आहे.
मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका… pic.twitter.com/lrLzuwufpZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2022
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रकल्पांना सुरुवात झाली. यातळे बरेचसे प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहेत. तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतर्फे या प्रकल्पांचे लोकार्पण होत असून श्रेयवादाचे राजकारण पाहायला मिळत आहे.