देवभूमी उत्तराखंड मधील चंपावत जिल्ह्यामध्ये भीषण असा अपघात झाला आहे. चंपावत जिल्ह्यातील सुखीढांग रीठा साहिब रास्ता येथे हा अपघात घडला आहे. या अपघातात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट दरीत कोसळली. हि गाडी आणि गाडीतील प्रवासी हे एका लग्नसोहळ्याहून परतत होते.
मंगळवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी या अपघाताचे वृत्त समोर आले. आज पहाटेच हा अपघात घडला. लग्नावरून परतत असताना पहाटे वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दरीत कोसळली. या अपघातानंतर गाडीतील चालकासह १४ जण जागीच मृत्युमुखी पडले. तर २ जण गंभीर जाहमी झाले आहेत. कुमाऊ जिल्ह्याचे पोलीस महासंचालक निलेश आनंद भरणे यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’
‘समीर वानखेडे बार परवाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी घाई कशाला?’
या संपूर्ण अपघाताची महिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचावकार्याचे पथक अपघाताच्या जागी दाखल झाले. त्यांनी लगेचच बचावकार्याला सुरुवात केली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताची दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. तर जखमींना ५५ हजार देण्यात येणार आहेत.