29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषकाश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या 'काश्मीर फाईल्स' चे ट्रेलर प्रदर्शित

काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाईल्स’ चे ट्रेलर प्रदर्शित

Google News Follow

Related

विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘दी काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अवघ्या काही तासातच या ट्रेलरला युट्युब वर काही लाख व्ह्यूज झाले असून प्रेक्षकांना हे ट्रेलर पसंतीस पडताना दिसत आहेत आता साडेतीन मिनीटांच्या ट्रेलर मध्ये चित्रपटाच्या एकूण आवाका आणि कलाकारांच्या भूमिकेविषयी प्राथमिक अंदाज येत आहे.

विवेक अग्निहोत्री यांचे लेखन दिग्दर्शन असलेला काश्मीर फाईल्स चित्रपट सुरुवातीपासूनच चांगला चर्चेत होता. बुद्धा इन ट्रॅफिक जॅम, ताश्कंत फाईल्स अशा वादग्रस्त विषयांना हात घातल्यानंतर विवेक अग्निहोत्री गेल्या काही वर्षांपासून काश्मीर फाईल्स या चित्रपटावर काम करत होते. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे झालेले हत्याकांड हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.

हे ही वाचा:

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

या चित्रपटात अभिनेता मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, प्रकाश बेलावडी, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव अशी कलाकारांची तगडी टीम पाहायला मिळणार आहे. तर झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्यासोबतच तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री हे देखील निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे भारताबाहेर प्रमोशन सुरू होते. अमेरिकेमध्ये या चित्रपटाचे काही विशेष कार्यक्रम पार पडले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसला होता. ३२ वर्षानंतर काश्मीरमधल्या काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे वास्तव या चित्रपटातून दाखवत असल्याचे चित्रपट निर्मात्यांचे म्हणणे आहे. ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा