काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा पक्षातील परिस्थितीबद्दलचा राग स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये ते काँग्रेसची स्थिती आणि दिशा याविषयी संताप व्यक्त करत आहेत.
वास्तविक मध्य प्रदेशातील रतलाममध्ये ते काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र पक्षाचे लोक इकडे-तिकडे विखुरले होते आणि ते त्याच्यापासून दूर उभे एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते. यासोबतच पक्षाचे काही कार्यकर्ते त्याचा व्हिडिओही बनवत होते. सध्या जी काँग्रेसची स्थिती आहे यामुळे दिग्विजय सिंह चांगलेच संतापले आणि या रागाच्या भरात त्यांनी त्या गोष्टी बोलल्या ज्या आजवर भारतीय जनता पक्ष बोलत आहे.
या परिस्थितीमुळे स्तब्ध झालेल्या दिग्विजय सिंह यांना पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसून आली नाही . यावेळी तेही विसरले की आपण काय बोलतोय ते व्हिडीओ रेकॉर्ड केले जात आहे .
#NarendraModi ji
Ka sapna saakaar hota hua dikh raha hai #CongressMuktBharat 😀 pic.twitter.com/aMmMT9FlMv— MJ Augustine Vinod 🇮🇳 (@mjavinod) February 20, 2022
व्हिडिओमध्ये काय आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार होत असल्याची कबुली देताना दिसत आहेत. सिंग म्हणतात, “तुम्ही समोरासमोर बोलायला तयार नाही. मी इथे उभा आहे, ते तिथे उभे आहेत, तुम्ही तिथे उभे आहात, आणि इतर लोक कुठेतरी उभे आहेत, हे कसे चालेल. २०२३ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसची शेवटची निवडणूक होणार आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. तुम्ही लोक प्रामाणिकपणे निवडणूक लढणार नसाल तर घरी बसा. आणि असेच चालत राहिले तर मग काँग्रेस परत येणार नाही. तुम्हाला कार्यकर्ता मिळणार नाही.
हे ही वाचा:
झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश
लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड
‘रश्मी ठाकरे यांनी सरपंचांना बंगले नावावर करण्यासाठी लिहिले होते पत्र’
पंधरा वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर २०१८ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, तेही केवळ पंधरा महिन्यांत सत्तेतून बाहेर पडले. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिला. अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर काँग्रेस सरकारला खुर्ची सोडावी लागली. दिग्विजय सिंह यांच्या या विधानावरून स्पष्ट होते की २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुका काँग्रेससाठी किती महत्त्वाच्या आहेत.