राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनवली आहे. चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आज २१ फेब्रुवारी रोजी रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली. १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवले होते. तसेच या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू प्रसाद यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
१३९ कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८ दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली.
हे ही वाचा:
ट्विटरवर ‘जस्टीस फॉर हर्ष’ हॅशटॅग होतोय ट्रेंड
दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यावरून नरेंद्र मोदींनी केले ‘सायकल’ला लक्ष्य
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश
राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल
शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने किमान शिक्षेचा आग्रह धरला. रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते. लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ याशिवाय कट रचण्याशी संबंधित कलम १२० ब आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले.