कर्नाटकमध्ये रविवारी २० फेब्रुवारी रोजी बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकच्या शिमोगामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. हिजाब वादाचे हे पडसाद असण्याच्या चर्चा सध्या सुरू असून आता हर्षला न्याय मिळावा यासाठी सोशल मिडीयावर जस्टीस फॉर हर्ष हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
राज्याचे गृहमंत्री अरागा जानेंद्र यांनी सांगितले की, चार ते पाच तरुणांनी मिळून हर्षची हत्या केली. मात्र, या हत्येमागे अद्याप कोणाचा हात आहे हे स्पष्ट झाले नसल्याचे ते म्हणाले. सध्या या परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेच्या विरोधात काही लोकांनी निदर्शने केली. काही लोकांनी वाहने जाळली. त्यानंतर आता सोशल मीडियावर हर्षच्या समर्थनार्थ लोक बोलत आहेत. तसेच त्याला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यावरून नरेंद्र मोदींनी केले ‘सायकल’ला लक्ष्य
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश
राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल
‘सुडाचे राजकारण कोण करते आहे ते जनता बघत आहे’
कर्नाटक राज्यात सध्या भगवा आणि हिजाब यामध्ये वाद सुरू आहे. या वादाचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत आहेत. त्यातच थेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या खुनामुळे हा तणाव आणखी वाढला आहे. बजरंग दलाच्या २६ वर्षीय हर्षा या कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.