29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारणएकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश

एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश

Google News Follow

Related

मुंबईच्या शेजारीच असणारा ठाणे जिल्हा हा कायमच शिवसेनेचा गड मानला जातो. पण या गडाला सुरुंग लावत तब्बल ३०० शिवसैनिकांना आपल्या गळाला लावण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रातील शाखाप्रमुखां सहीत ३०० कार्यकर्त्यांना भाजपाने पक्षात सामावून घेतले आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधान परिषदेचे आमदार तथा भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या भाजपाच्या ठाणे शहर मुख्य कार्यालयत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या किसन नगर भागातील शाखाप्रमुख संजय नार्वेकर, तसेच कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे युवासेना निरीक्षक निलेश लोहोटे, उपशाखा प्रमुख भरत देसाई, आशिष चव्हाण, नितेश पवार यांच्यासहित किसन नगर १, २, ३, ४ आणि पडवळ नगर भागातील तीनशे शिवसैनिकांनी कमळ हाती घेतले आहे.

हे ही वाचा:

‘सुडाचे राजकारण कोण करते आहे ते जनता बघत आहे’

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल  

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून विविध ठिकाणी पक्षांतर होताना दिसत आहे. पण असे असले तरी देखील एकनाथ शिंदे यांची ठाणे शहरातील आणि एकूणच जिल्ह्यातील संघटनेवर चांगलीच पकड असल्याचे मानले जाते. पण असे असतानाही त्यांच्याच विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी पक्षांतर करत भाजपा मध्ये जाणे याची जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे शिंदे यांच्या नेतृत्वाला भाजपा जोरदार आव्हान देत असल्याचे शहरात बोलले जात आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पक्षांतर महत्वाचे मानले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा