सरकारने शहरातील सर्वांना पाईपने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व ४,३७८ शहरी स्वराज संस्थांना पाणी पुरवठा पाईपने करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मैल्याचे, सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि बांधकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार स्वच्छ पाणी, स्वच्छता, आणि स्वच्छ वातावरणाच्या महत्त्वाबद्दल सांगितले आहे. चांगल्या आरोग्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. जल जीवन मिशन (शहरी) लवकरच सुरू करण्यात येईल. यात सर्व ४३७८ शहरी स्वराज्य संस्थांना पाईपने पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. शहरांतील २.८६ करोड घरांना याद्वारे नळ जोडणी देण्यात येणार आहे. याबरोबरच ५०० अमृत शहरांना देखील नळजोडणी देण्यात येणार आहे.
या कामासाठी एकूण ₹२.८७ लाख करोड खर्च येणे अपेक्षित आहे.
स्वच्छ भारत २.०
गृहनिर्माण आणि शहर नियोजन मंत्रालयांतर्गत चालू असलेल्या स्वच्छ भारत मिशनचा (शहरी) दुसरा टप्पा या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आला.
“या टप्प्यात शहरात मैल्याचे, सांडपाण्याचे योग्य नियोजन, कचऱ्याचे वर्गीकरण, एकवेळ वापरायोग्य प्लॅस्टिकच्या वापरातील घट, वायूप्रदुषणातील घट आणि भूभरण क्षेत्रावर जैविक उपाययोजना राबवण्याचे ठरविण्यात आले आहे.”
स्वच्छ भारत २.० ही योजना पुढील पाच वर्षाच्या अंतरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे २०२१ पासून २०२६ पर्यंत ही योजना राबविण्यात येईल. त्यासाठी ₹१.४१ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.